पुलात अडकून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू #death

गोंडपिपरी:- आई वडीला सोबत भेटी-गाठी करिता नातेवाइकाकडे आलेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा पुलाखाली अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. 10 जुलै रोज रविवारला गोंडपीपटरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे घडली आहे. मृतक चिमुकलीचे नाव सानू मंगेश चुनारकर वय 3 वर्ष असून मूल तालुक्यातील चिमडा येथील रहिवाशी होती.
गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे नातेवाइकाकडे तीन दिवसांपूर्वी आली होती. तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने ती आई सोबत विठ्ठलवाडा येथे नातेवाइकाकडे थांबली. मुसळधार पावसाने नदी, नाले, गावातील नाली, छोटे पूल पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत अश्यातच रविवारला 9 वाजताच्या सुमारास घरासमोरील नालीत पाय घसरून पडली नाली तुडुंब भरून वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर नालीलगत असलेल्या पुलात जाऊन अडकली.
घरच्यांनी आरडाओरड करताच तिला वाचविण्यासाठी दोन युवक नालीत उतरले आणि तिला पुलातून बाहेर काढन्याचा प्रयत्न केला. दहा ते पंधरा मिनिट चा वेळ निघून गेला मात्र ती चिमुकली पुलाच्या बाहेर न पडल्याने घरच्यांची धाकधूक वाढली. पुलात बाबूं टाकुन पळताळणी करताच ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर पूलाच्या बाहेर निघाली मात्र बराच वेळ पुलाखालील पाण्यात अडकून राहील्याने बेशुद्ध पडली. लागलीच गावातील एका ऑटो ने तिला ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आलेअसता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत