Top News

जिल्ह्याला हवामान विभागाकडून "रेड अलर्ट" जारी #gadchiroli #chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यासाठी *10, 11, 12* जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत काही ठिकाणी अतिमूसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नदी पुलावरून पाणी वाहत असल्यास पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये. हवामान विभागाने पुढील तीन दिवस संपूर्ण गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. ही सर्व बाब लक्षात घेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

सर्व यंत्रणांना हाय अलर्टवर; कोणीही विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन


गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीना यांनी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना तातडीने मुख्यालयात राहण्याच्या सूचना दिल्या असून जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिला आहे.





तसेच पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या दसरम्यान कोणीही विनाकारण बाहेर पडू नये, मुसळधार पावसा दरम्यान विविध ठिकाणचे नाले पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणीही पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नये असे आवाहन सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

चालकाचा निर्णय चुकला आणि 6 प्रवाशांसह पाण्यात वाहून गेला ट्रक

दरम्यान काल 9 जुलै रोजी रात्रोच्या सुमारास पेरमिली नाल्यावरुन ट्रक वाहून गेला यात तिघांचा मृत्यू झाला. तर तीन जण सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने