चालकाचा निर्णय चुकला आणि 6 प्रवाशांसह पाण्यात वाहून गेला ट्रक #gadchiroli

तिघांचे मृतदेह सापडले
गडचिरोली:- राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मागील २-३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. तर अनेक ठिकाणी छोट्या नाल्यांना पूर आले आहेत. यामुळे नागरिकांना सतर्क राहाण्याचा सल्ला दिला गेला आहे. मात्र, आता गडचिरोलीमधून एक दुर्घटना समोर आली आहे. यात ट्रक वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत पेरमिली गावालगत असलेल्या नाल्यावर प्रवासी असलेला ट्रक गेला वाहून गेला आहे.
यानंतर ट्रकमधून प्रवास करणाऱ्या तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. यात पाच ते सहा प्रवासी प्रवास करत होते. आलापल्ली भामरागड मार्गावर पेरमिली लगत असलेल्या नाल्यावरील पुलावर शनिवारी सकाळपासून पाणी होतं. रात्री पाणी कमी झाल्याने चालकाने ट्रक पाण्यात घातला

मात्र, चालकाचा अंदाज चुकला आणि हा ट्रक पाण्यासोबत वाहून गेला.
रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. अहेरी तालुक्यातील पेरमिली गावालगतच्या नाल्यावरची ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक एसडीआरएफ पथक आणि गाव पातळीवरील नागरिकांकडून शोध मोहीम सुरू आहे. आतापर्यंत यातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत