Top News

ग्रामपंचायत मध्ये कार्यरत संगणक परिचालक मागील सहा महिण्यापासून पगाराच्या प्रतीक्षेत #chandrapur #gadchiroli #Chamorshi


चामोशी:- आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 28 हजार ग्रामपंचायती मध्ये डिजिटल तसेच पेपरलेस काम करणाऱ्या व शासकीय योजनेचे संपूर्ण ऑनलाइन काम संगणक परिचालक करीत असतात. यामुळे ग्रामपंचायत ची संपूर्ण कामे सोपी झालीत. पण संबंधित संगणक परिचालक सी. एस. सी कंपनी च्या माध्यमातून ग्रामपंचायत मध्ये काम करतात. ग्रामपंचायत जिल्हा परिषद ला प्रती महिना 12341रु देत असतो. व जिल्हा परिषद • मार्फेत ते सी. एस. सी. कंपनीला दिले जातात. या सी.एस.सी. कंपनी संगणक
परिचालकाला अगदी 6930:00 रु मानधन देतात. पण हे मानधन यांना कंपनी च्या मेहरबानीने 5ते 6 महिने दिल्या जात नाही. साध्यस्थित आज संगणक परिचालकाच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मागील सहा महिन्यापासून या संगणक परिचालक चे वेतन थकीत ठेऊन सी. एस. सी. कं यांचे चांगलेच पिळून करत आहे.
मागील बारा वर्षापासून कार्यरत असलेले संगणक परिचालक ना ग्रामपंचायत चपरश्या पेक्षा ही कमी मानधन मध्ये मिळत ही खूप मोठी शोकंतिका आहे. सध्या ग्रामपंचायत मधील 15वित्त अंतर्गत आपले सरकार सेवा केंद्राचे रक्कम जिल्हा परिषद याला एका वर्षांकरिता वार्षिक रक्कम पाठवली जाते परंतु संगणक परिचालक यांना पाच पाच ते सहा महिने पगार होत नाही तेव्हा आपल्या कुटुंबाचे उदर निर्वाह कोणत्या पद्धतीने करायचे ते मोठ्या संकटात आहे त्यामुळे सी एस सी कंपनी भोंगळ कारभारामुळे तीव्र नापसंती केली आहे.
तरी सी.एस.सी. कंपनी या संगणक परिचालकचा तीव्र आक्रोषाची वाट न बघता संपूर्ण परिचालकाचे वेतन लवकर करावे अन्यता काम बंद करण्यात येईल असे या संगणक परिचालक म्हणणे आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने