अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार #torture

Bhairav Diwase
0

सिंदेवाही:- शहरातील अल्पवयीन पीडीतेच्या घराशेजारी राहत असलेल्या आरोपीने रात्रीचा फायदा घेत अल्पवयीन असलेले पिडीते सोबत लैंगीक अत्याचार केला. त्याआधारे मंगळवार 26 जुलै ला सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आरोपी 2022 या वर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात च्या रात्रो अंदाजे २ वाजताच्या सुमारास अल्पवयीन असलेल्या पिडीतेच्या घरी जाऊन पिडीतेचे दोन्ही हात पकडून तोंड दाबून जबरदस्ती करून शारीरिक संबंध केला. आरोपीने पिडीतेला ही बाब जर कोणालाही सांगितली तर मी तुला जीवे मारणार अशी धमकी दिली होती. अशी तक्रार अल्पवयीन पीडीतेने मंगळवार 26 जुलै पोलीस स्टेशनला सांगितले त्याआधारे सिंदेवाही पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर अप क. १९९/ २०२२ कलम ३७६(१), ३७६ ( २, J), ४५०, ५०४, ४ सहकलम पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक घारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक फुलेकर मॅडम करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)