Top News

खैरे कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार #chandrapur #bhadrawati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- खैरे कुणबी समाज संघटना वरोरा तालुका तर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा वरोरा येथील कटारिया भवनात नुकताच संपन्न झाला.
संत तुकाराम महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून डॉ. विजयराव देवतळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. गो. थुटे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून निखिल राऊत, वैभव धंदरे, प्रमुख अतिथी म्हणून ॲड. शरदराव कारेकर, चंद्रभागा कोहपरे, वंदना बरबटकर, नर्मदा बोरेकर, राजेंद्र लडके, रोहिणी देवतळे, करण देवतळे, अनिल झोटिंग, उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, भेटवस्तू, गौरव चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी निखिल राऊत आणि वैभव धंदरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने