आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या तर्फे पूरग्रस्तांना कीटचे वाटप #bhadrawati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भद्रावती तालुक्यातील पूरग्रस्त ग्रामस्थांना एक हात मदतीचा म्हणून राज्याचे माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यातर्फे नुकतेच अनाज कीटचे वाटप करण्यात आले.
तालुक्यातील कोची, पिपरी, चारगांव, कोंढा आणि माजरी या गावातील पूरग्रस्त नागरिकांना अनाज कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी देवराव भोंगळे, चंद्रकांत गुंडावार, अफझलभाई, नरेंद्र जीवतोडे, अमित गुंडावार, किशोर गोवारदिपे, प्रवीण ठेंगणे, आकाश वानखेडे, विवेक सरपटवार, बालू ताठे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत