Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

पिपरी (धानोरा) शालेय विद्यार्थ्यांना गणवेष वितरण #chandrapur

चंद्रपूर तालुक्यातील पिपरी (धानोरा) येथील शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वितरित करण्याचा कार्यक्रम प्रा.विजय बदखल व पारस पिंपळकर यांच्या पुढाकारातून सकाळी ठेवण्यात आला.
याठिकाणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आवर्जून उपस्थित राहत विद्यार्थ्यांना शालेय गणवेषाचे तसेच धानोरा येथील होतकरू विद्यार्थ्यांनी कु. मयूरी बोढे हिला आर्थिक सहाय्याचे वितरण केले. यासोबतच स्थानिक गोरगरिबांना अन्नधान्य किटचे वाटपही त्यांनी प्रमुखांसह याप्रसंगी केले.
यावेळी, वपरीक्षेत्राधिकारी संतोष थिपे, सरपंचा सौ. वैशालीताई माथणे, उपसरपंच हरीओम पोटवडे, दै. सकाळचे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद काकडे, गणेश आवारी, भुवन चिने, ज्योतीताई पिंपळकर, मायाताई मुसळे, वर्षाताई निब्रड, सुनिताताई मत्ते, डॉ. दिलीप निब्रड, रंगनाथ पवार, संतोष मत्ते, सुरेश चौधरी, विठ्ठल भोयर, अरूण तुराणकर यांचेसह शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत