पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पणानंतर रुग्णालयात झाली पहिली डिलिव्हरी #pombhurna

पोंभुर्णा:- पहिली मुलगी रुग्णालयात जन्माला आली म्हणजे नक्कीच या रुग्णालयातून माया ममतेनी लोकांची सेवा होईल असा अशावाद सुधीरभाऊंनी व्यक्त केला.
ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा लोकार्पण कार्यक्रम 20 ऑगस्ट ला पार पडला आणि 23 तारखेला पाहिली डिलिव्हरी झाली आणि पहिली मुलगी झाली. भाग्यश्री वेदनाथ तोरे रा. थेरगाव ता. पोंभुर्णा या मातेला कन्यारत्न प्राप्त झाली. नक्कीच "बेटी बचाव बेटी पढाव" सारख्या उपक्रम राबविले जातात. रुग्णालयात पहिली मुलगी जन्माला आली याचा आनंद साजरा करताना आ. सुधीर मुनगंटीवार वने व सांस्कृतिक मंत्री यांचे कडून मुलीच्या शिक्षणासाठी 5000 रु फिक्स करण्यात आले तसेच अल्का आत्राम यांचे कडून साडी चोळी बाळाला कपडे फळे देत भाजपा महिला आघाडीच्या वतीने आईला शुभेच्छा देण्यात आले.

यावेळी अल्का आत्राम जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी, सुलभा पिपरे नागराध्यक्षा, डॉ. समृद्धी राऊत, वैशाली बोलमवार शहर अध्यक्ष, नगरसेवक श्वेता वनकर, नंदा कोटरंगे, आकाशी गेडाम, रोशन ठेंगणे, सुगत गेडाम उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या