Top News

जिवती तालुक्यातील शेतकरी आत्महत्या ग्रस्त पीडित कुटुंबियांना 3 लाखाची तात्काळ आर्थिक मदत द्या:- सुदाम राठोड #chandrapur #Jivati

जिवती:- जय विदर्भ पार्टी तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले जिवती तालुक्यामध्ये दोन आठवड्यामध्ये पाच शेतकरी आत्महत्या झाले आहे, म्हणून या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आपण कठोर पाऊले उचलून जनहिताच्या योजना आणून अमलबजावणी तात्काळ करून आपण दिलेल्या घोषणेचा हित पूर्ण कराल आत्महत्या मुक्त महाराष्ट्र ही आपली घोषणा शेतकरी आत्महत्या रोखुन पूर्ण कराल, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.
धोंडाअर्जुनी येथील २२ वर्षीय युवक शेतकरी वकील गोपीनाथ चव्हाण आणि मालगुडा येथील ३० वर्षीय युवक शेतकरी संजय किसन जाधव यांनी विष घेऊन आत्महत्या केली आहे. कारण सततच्या नापिकीमुळे आणि अतिवृष्टी मुळे कोणतेच पिकाचे उत्पन्न निघाले नाही याच्या निराशेतून शेतकरी आपले जीवन संपवत आहे.
मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्या या प्रकरणामध्ये स्वतः लक्ष वेधून तात्काळ ३ लाखाची दोन्ही पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन न्याय मिळवून द्याल ही विंनती जय विदर्भ पार्टीचे नेते सुदाम राठोड यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने