कुंभार समाजातील मूर्ती विक्री दुकानदारांकडून अनामत रक्कम घेऊ नये #chandrapur

Bhairav Diwase

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील तयार केलेल्या गणेश मूर्तीची विक्री आझाद बगीच्या जवळील सिटी शाळेलगत दोन दिवसांकरीता स्टॉल लावून गणेश मूर्ती विक्रीसाठी आपणाकडून ना हरकत प्रमाणपत्रासह नगर प्रशासनाकडून रुपये 2,000 / - प्रमाणे प्रत्येक मूर्ती विक्रीदाराकडून अनामत रक्कम घेण्यात येते.
सर्व मूर्तीकाराकडून भाजयुमोला निवेदन देण्यात आले की , त्यांच्या परिस्थितीनुसार मूर्ती बनवायच्या वेळेस पैशाची कमतरता असल्यामुळे व मूर्तीकारांचे बँकेमध्ये खाते नसल्यामुळे व बरेच मूर्तीकार अशिक्षीत असल्यामुळे अनामत रक्कम घेण्यात अडचणी येतात. त्यामुळे सर्व मूर्तीकारांतर्फे भाजयुमो ला निवेदन देण्यात आले की, कुंभार समाजातील अडचणीचा विचार करुन अनामत रक्कम रद्द करण्यात यावी. याकरीता भाजयुमो आपणास सुचवितो की, ही अनामत रक्कम कुंभार समाजातील मूर्तीकारांकडून घेण्यात येऊ नये. असे निवेदनाद्वारे चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त यांच्या कडे मागणी करण्यात आली.
यावेळी उपस्थित विशाल निंबाळकर जिल्हाध्यक्ष भा.ज.यु.मोर्चा चंद्रपूर महानगर, गणेश रामगुंडेवार अध्यक्ष भा.ज. यु.मोर्चा मध्य (बाजार) मंडळ चंद्रपूर. आणि संत गोरोबा काका कुंभार समाज सेवा समिती चंद्रपूर चे अध्यक्ष अशोक ताटकंटीवार, विभागीय अध्यक्ष अजय मार्कंडेवार तसेच संत गोरोबा कुंभार समाज सेवा चे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.