Top News

गडचांदूर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष गोत्यात? #Chandrapur #Korpana #Gadchandur


आत्महत्या प्रकरणात सुसाईड नोटमध्ये उल्लेख
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- औद्योगिकरणामुळे गडचांदूर परिसरातील शेतजमिनीला सोन्याची झळाळी प्राप्त झाली आहे. अशाच जमिनीच्या एका व्यवहारात येथील विलास मांडवकर यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. काही दिवसांपूर्वी त्यांनी विषप्राशन केले उपचारासाठी नेत असताना त्यांचा वाटेत मृत्यू झाला.
दरम्यान, मांडवकर यांची एक कथित सुसाईड नोट आता समोर आली आहे. यात विलास यांनी मनोज शर्मा नामक इसमासोबत ६० लाख रुपयात त्यांच्या आजीच्या नावाने असलेल्या शेतजमिनीचा सौदा केला. मात्र, शर्मा यांच्यासह दिनेश सोनी, मनोज शर्मा, बाळू घायवनकर, गजानन गानफाळे, पंकज गंपावार यांनी पाच एकराऐजवी वडिलांकडून ११.५ एकरीच रजिस्ट्री करुन घेतली. शरद जोगी आणि प्रशांत पाचभाईने पैशाचे आमिष दाखवून आमच्याकडून जमीन हिसकावली, असा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये आहे.
वडगाव शेतशिवारात विलास यांच्या आजीच्या नावाने ११. ५ एकर शेती होती. त्यापैकी पाच एकर शेती विक्रीचा व्यवहार शरद जोगी यांच्यासोबत झाला होता. परंतु रजिस्ट्री ११. ५ एकरची केली. धनादेशद्वारे पैसे दिले. परंतु दबाब टाकून ते पैसे परत मागत होता. एक धनादेश परत घेतला. दुसरा धनादेश वटला. त्याचे पैसे परत दे नाही तर कुटुंबीयाला जीवानिशी मारतो, अशी धमकी देत होता. याच धमकीला घाबरुन वडिलांनी आत्महत्या केली, असा आरोप मृताच्या मुलाने केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे गडचांदूर नगरपरिषदेचे उपाध्यक्षांचा सुसाईड नोटमध्ये नाव आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला अटक करु, अशी ग्वाही ठाणेदार सत्यजित आमले यांनी मृताच्या नातेवाईकाना दिली. दुसरीकडे जोगी यांनी सुसाईड नोट बनावट असल्याचा दावा केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने