Top News

गोंडपिपरी नगरपंचायतचा अवैध बांधकामावर हातोडा #chandrapur #gondpipari


ठाणेदारांसह तहसीलदारही उतरले मैदानात
गोंडपिपरी:- नगरपंचायत प्रशासनाने ही अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. मुख्य मार्गावरील कच्चे बांधकाम, नालीवरची दुकाने, शेड आदी हटवून फुटपाथ नागरिकांसाठी रिकामे करण्यासाठी अतिक्रमणधारकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
यावेळी तहसीलदार तथा मुख्याधिकारी के. डी. मेश्राम यांनी नगरपंचायत गोंडपिपरी, १३ सप्टेंबर नगरपंचायत पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पोलिसांच्या मदतीने अतिक्रमणधारकांवर हातोडा चालविला आहे.
मंगळवार, १३ सप्टेंबरला प्रशासन आणि सकाळपासून पदाधिकारी अशी संयुक्त चमू गोंडपिपरी शहराच्या मुख्य मार्गावर फौज फाट्यासह दाखल झाली. यादरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला .
यावेळी ठाणेदार जीवन राजगुरू, पीएसआय धर्मराज पटले, बांधकाम सभापती सुरेश चिलनकर, पाणीपुरवठा सभापती सचिन चिंतावार, नगरसेवक सुनील संकुलवार, महेंद्रसिंह चंदेल, न. पं. कार्यालयीन अधिक्षक बेग, शितल वनकर यांच्यासह कर्मचारी व पोलिस कर्मचारी उपस्थित नगरपंचायत होते. दरम्यान, यावेळी शहरातील अतिक्रमण साफ होऊन वर्दळ आणि दाटीवाटीच्या समस्येतून मार्ग निघताना दिसून आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने