Top News

गॅस गळतीने घराला आग #Chandrapur #fire


सिस्टर कॉलनीतील घटना; सुदैवाने जीवितहानी टळली
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- शहरातील सिस्टर कॉलनी येथील एका घरात गॅस गळतीने आग लागल्याची घटना मंगळवारी (ता. १३) दुपारी घडली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली आहे. परिसरातील नागरिकांनी रामनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविले.
सिस्टर कॉलनीत कृष्णा टेंमुडें राहतात. मंगळवारी दुपारी त्यांच्या घरातील सिलिंडरने अचानक पेट घेतला. यावेळी त्यांनी घरातील गाद्या टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी अग्निशमन विभागाला बोलावून आगीवर नियंत्रण मिळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने