भद्रावती:- जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासल्याची घटना भद्रावती तालुक्यातील माजरी येथे घडली आहे. पोलिसांनी अत्याचारी बापाला अटक केली आहे.
या प्रकरणाची तक्रार माजरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून शाळकरी मुलगी असलेल्या पोटच्या मुलीवर बापाने अत्याचार केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची तक्रार माजरी पोलीस ठाण्यात गुरूवारी (दि.२२) करण्यात आली. या नराधम बापावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनात माजरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनीत घागी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघा गोखरे करीत आहेत.