Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू #chandrapur #Leoparddeath


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
बल्लारपूर: चंद्रपूर (chandrapur) जिल्हयात मोठया प्रमाणावर वन्यप्राण्यांचे वावर आहे. यातच चंद्रपुर मार्गावरील भिवकुंड येथील निर्मल धाबा जवळील नाल्या जवळ रविवारी रात्रौच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या झाल्याची (Leoparddeath) मृत्यू घटना उघडकीस आली.

चंद्रपूर मार्गावरील भिवकुंड (Bhiwkund) येथील निर्मल धाबा जवळील नाल्याजवळ एका मादी जातीचे बिबट (Leopard) अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्युमृखी पडल्याची माहिती बल्लारपूरचे वनपरिक्षेत्राधिकारी नरेश भोवरे यांनी माहिती झाली‌. भोवरे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान मृत बिबटयाचा शवाचा मौका पंचनामा करुन शवास ताब्यात घेतले. सोमवारी सकाळी 11.00 वाजता बिबट वन्यप्राण्याचे शवविच्छेन वन्यजीव उपचार केंद्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे करण्यात येणार आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभागाच्या उपसनसंरक्षक श्वेता बोहु, सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांचे मार्गदर्शनात वन परिक्षेत्राधिकारी नरेश भोवरे करीत आहे. यावेळी वनरक्षक वर्षा पिपरे, एस. एम. बोकडे, टि.ओ. कामले व ए. एम. चहांदे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत