स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थानी स्वतः नियोजन करून अभ्यास करणे महत्वाचे.- मनीषा मोरे #Gadchandur

Bhairav Diwase


कोरपना:- प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय तर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पर कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचे स्वतः नियोजन करून अभ्यास करणे महत्वाचे असून त्या दृष्टीने प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालय विद्यार्थांच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल टाकत असून विद्यार्थ्यांनी योग्य असे ज्ञान संपादन करून यश प्राप्त करावे असे प्रतिपादन कु. मनीषा मोरे हिने केले.


 कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. नानेश्वर धोटे,प्रमुख मार्गदर्शक कु.मनीषा मोरे, प्रमुख अतिथी प्रा.पंकज देरकर प्रा.कु. मनीषा मरसकोल्हे,प्रा.एजाज शेख, उपस्थित होते.अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी महाविद्यालय हे स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सतत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विधायर्थ्यासाठी मार्गदर्शन पर उपक्रम राबवित असून त्यातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मनोबल उंचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत व्यक्त केले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून प्रा. कुमारी मनीषा मरसकोल्हे यांनी विद्यार्थ्यांच्या यशात महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्याo उपक्रमाबद्दल माहिती दिली. सदर कार्यक्रमात संविधान दिनाचे औचित्य साधून विध्यार्थ्यांना भारतीय सविधानाबद्दल माहिती देऊन संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. संचालन प्रा.रेणू मॅडम यांनी केले.तर आभार कु.वैष्णवी क्षीरसागर हिने मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज तलांडे उपस्तिथ विध्यार्थ्यानी सहकार्य केले.