Top News

दुचाकी-कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर #accident #chandrapur #Korpana #Gadchandur

दुसऱ्या तरुणीचा सक्षगांध होण्याआधीच तिचा अपघात




(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- सकाळी 10 वाजता बाखर्डी जवळ भीषण अपघात होऊन एका विद्यार्थिनीचा जागेवरच मृत्यू झाला तर ज्या तरुणीचे आज साक्षगांध होते. ती तरुणी व दुचाकी चालक तरुण गंभीर रित्या जखमी असून त्यांना चंद्रपूर येथे खाजगी रुग्ण्यालयात उपचार सुरू आहे.

महात्मा गांधी शाळा गडचांदूर येथील विद्यार्थिनी गायत्री रवींद्र बोन्डे रा. कढोली खुर्द हिचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. बाखर्डी जवळ आज 18 डिसेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. नातलग मुलीच्या साक्षगंधाकरिता ती बाखर्डी येथे गेली होती. दरम्यान त्या मुलीसह ती गडचांदूरकडे बाईकने निघाली होती. दरम्यान कारने बाईकला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर साक्षगंध जिचा होता ती मुलगी आणि दुचाकी चालक गंभीर जखमी झाले.

गायत्री ही महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाची बारावीची विद्यार्थिनी होती. विविध उपक्रमात तिचा सक्रिय सहभाग असायचा. गायत्रीच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने