Top News

शुभांगी भडबडे यांना डॉ. शोभणे यांच्या कादंबऱ्या वाचण्याची शिक्षा #chandrapur



चंद्रपूर:- चंद्रपूरभूषण शांताराम पोटदुखे साहित्य परिसर, चंद्रपूर - विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने चंद्रपूरातील अग्रणी शिक्षण संस्था सर्वोदय शिक्षण मंडळ, गोंडवाना विद्यापीठ व सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनात 'अभिरूप न्यायालय' हे काल्पनिक सत्र घेण्यात आले. यात आरोपी म्हणून जेष्ठ लेखिका शुभांगी भडभडे या होत्या. यावेळी सरकारी वकील म्हणून डॉ. रवींद्र शोभणे यांनी तर आरोपीचे वकील म्हणून प्रकाश एदलाबादकर यांनी काम पाहिले. यावेळी न्यायाधीश म्हणून मोहन पांडे विराजमान होते.

या अभिरूप न्यायालयात शुभांगी भडबडे यांच्या साहित्यावर आरोप करण्यात आलेत. आरोपाचे खंडन शुभांगी भडभडे यांनी केले. यासाठी सरकारी वकील प्रकाश एदलाबादकर यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली. डॉ. रवींद्र शोभणे यांनी सदर आरोपांबाबत युक्तिवाद करीत यशस्वीपणे परतून लावले. याला प्रेक्षकांनी दाद दिली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत न्यायाधीश मोहन पांडे यांनी शुभांगी भडभडे यांना डॉ. शोभणे यांच्या कादंबऱ्या वाचण्याची शिक्षा दिली. हा सगळा अभिरूप न्यायालयाचा कार्यक्रम अतिशय खुसखुशीत, विनोदी पध्दतीने संपन्न झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने