अनियंत्रित कार दुभाजकावर धडकली #chandrapur #accident


कार चालकाचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी


चंद्रपूर:- नागपूर चंद्रपूर मार्गावरील नंदोरी शिवारात कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर धडकून पलटी झाली. या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना आज 20 रोजी दुपारच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज शुक्रवार 20 रोजी गोपाल सिंग किसन सिंग (58) व त्यांची पत्नी सूक्ष्मा (50) हे एम. एच. 26 ए. के. 3919 क्रमांकाच्या कारने नागपूर चंद्रपूर मार्गाने नागपूरवरून घुघुस येथे जात असताना नंदोरी शिवारात गोपाल सिंग किसन सिंग यांचे कारवरुन नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर धडक देऊन विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर जाऊन पलटली. यात गोपाल सिंग किसन सिंग यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी जखमी झाली.

या घटनेची माहिती जाम महामार्ग पोलिस कर्मचारी स्नेहल राऊत यांना मिळताच रुग्णवाहिका घेऊन कर्मचार्‍यांसह घटनास्थळावर पोहोचले. जखमीला कारमधून बाहेर काढून रुग्णालयात पाठविले व दोन्ही बाजूच्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास समुद्रपूर पोलिस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत