नितीन सुबोध गुप्ता मूळ बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील आहेत आपले शिक्षण एम. एस. सी. एग्रीकल्चर पर्यंत झाले आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे पुष्पशास्त्र व प्रांगण विद्या विभागावर प्रमुख यांनी विद्यार्थी दशेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे.. विद्यापीठातील एम.एस.सी. कृषीच्या शंभर जागा वाढवण्या करिता आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. तसेच कृषी महाविद्यालयात विद्यार्थी सहकार भंडाराची स्थापन केली. कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये स्वयंरोजगार उद्यमिता कौशल्य वाढीसाठी यांनी अनेक उपक्रमांचे आयोजन यशस्वीरित्या केले. 2005 ते 2015 पर्यंत डॉ.प.दे.कृ. वि. अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र गोंदिया, गडचिरोली व बुलढाणा येथे कार्यरत कालावधीत शेतकन्यांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन यशस्वीरित्या केले. वर्तमानात अग्रीविजन राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य आहेत तसेच जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ जबलपूर येथे व्यवस्थापन व कार्यकारी परिषद सदस्य आहेत. 1995 पासून अभावीप च्या संपर्कात आहेत व बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. आपण चिखली व अकोला नगर कार्यकारणी सदस्य, विदर्भ प्रांत कार्यकारीनी सदस्य कृषी शिक्षण विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांत प्रमुख, अकोला महानगर अध्यक्ष, मागील तीन वर्षापासून विदर्भ प्रांत उपाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्यांचे निर्वहन केले आहे. तसेच स्वावलंबी भारत अभियानाचे विदर्भ प्रांत सह समन्वय म्हणून जबाबदारी आहे. व त्यांचा निवास अकोला येथे आहे. वर्ष २०२२-२३ साठी त्यांची विदर्भ प्रांत अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
शक्ती प्रकाश केराम मूळ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील आहात. आपण 2014 पासून अभाविपच्या संपर्कात आहात. आपले शिक्षण msc झूलॉजि पर्यंत झाले आहे. आपण अनेक विद्यार्थी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. छात्रसंघ निवडणूक खुल्या कराव्यात विद्यार्थ्यांना त्यांची शिष्यवृत्ती चालू सत्रात देण्यात यावी सेमिस्टर पॅटर्न बंद करण्यात यावे या साठी तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या ताफा अडवून मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन मध्ये सक्रिय सहभाग. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर covid batch असा शिक्का आल्यास विद्यार्थ्यांचे भविष्यात नुकसान होईल ते अस होऊ नये या करिता कृषी विद्यापीठात आंदोलन करून कृषी मंत्री यांना तो निर्णय मागे घ्यायला लावण्यात मोलाचे योगदान. कोरोना काळात महाविद्यालय बंद असतांना सुद्धा विद्यार्थ्यांनकडून फी आकारली जात होती त्यामुळे कॉविड काळातील फी परत मिळावी या साठी अमरावती विद्यापीठाच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका. कोरोना काळात गडचिरोली सारख्या जनजाती बहुल जिल्ह्यात अतिदुर्गम भागात जाऊन कोरोना लसी बद्धल जनजागृती करून जनजाती समाजात कोरोना लसीबद्धल असलेला संभ्रम दूर करण्यात मोलाचे योगदान, गोंडवाना विद्यापीठाच्या NSS विभागात झालेल्या घोळा विषयी विद्यापीठाच्या वर्धापनदिनि कार्यक्रम उधळून NSS अधिकाऱ्या चे निलंबनाची मागणी करत यशस्वी आंदोलन आपण जून 2018 पासून पूर्णवेळ आहात. आर्णी नगर मंत्री, आर्णी भाग संयोजक, अकोला महानगर संघटन मंत्री, गडचिरोली जिल्हा संघटन मंत्री, विदर्भ प्रात जनजाती छात्र कार्य संयोजक अश्या विविध जबाबदाऱ्यांचे निर्वहन केले आहे. वर्तमानात आपन गडचिरोली विभाग संघटन मंत्री अशी जबाबदारी आहे आपले केंद्र गडचिरोली आहे. वर्ष २०२२-२३ साठी त्यांची विदर्भ प्रांत मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.