Top News

"डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने" एक उपयुक्त पुस्तक #chandrapur #Article

खुप छान पुस्तक आहे. डिजिटल मीडिया बद्दल संपूर्ण माहिती या पुस्तकात दिलेली आहे. कुणाला पुस्तक पाहिजे असेल तर संपर्क साधावा....

भैरव धनराज दिवसे
8007101459, 9325856751


तंत्रज्ञानाने जशी प्रगती केली तशी माध्यमांची रचना बदलत आहे. गावापासून शहरापर्यंतची माणसे आणि दुर्गम भागापासून जगापर्यंतची गावे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडली गेली आहेत. त्यामुळे संपूर्ण जग एक गाव झाल्यासारखे झाले आहे. तंत्रज्ञानाने डिजिटल मीडिया व सोशल मीडियाची भर घातली. त्यामुळे विद्यार्थी असो की व्यावसायिक, प्रगतशील शेतकरी असो की व्यापारी, वाचक असोत की माध्यम हे सारे चक्र आता या मीडियाच्या भोवती फिरू लागले आहे. मात्र अनेकांना सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियातील बारकावे आजही समजत नाहीत. तसे शिक्षण कुठे उपलब्ध नाही. त्यामुळे या माध्यमांचा वापर करून आपल्या व्यावसायिक जीवनाची प्रगती करण्यासाठी अनेकदा अडचणी येतात. एखादा छोटा व्यवसाय मोठा करण्यासाठी अशा माध्यमांचा उपयोग अत्यंत चांगल्या पद्धतीने केल्यास फायदा होऊ शकतो हे "डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने" या पुस्तकाच्या माध्यमातून समजून घेता येऊ शकते.

डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. अवघ्या काही दिवसातच डिजिटल माध्यम क्षेत्रातील पत्रकार, नवोदित, डिजिटल व्यावसायिक आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी या 500 हुन अधिक पुस्तकाची मागणी केली. मुळातच हे पुस्तक नव्या माध्यमाची कठीण आणि किचकट प्रक्रिया सोपी करणारं आहे. डिजिटल माध्यमांची संख्या प्रचंड वाढली आहे. इतकेच नव्हेतर सोशल आणि डिजिटल माध्यम वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इंटरनेटच्या युगात डिजिटल मीडियात मोठे बदल होत आहेत. डिजिटल मीडियातील अनेक मार्गदर्शक साहित्य यू-ट्युब, वेबसाईटवर उपलब्ध आहे; मात्र, ते इंग्रजी किंवा हिंदी भाषेत आहेत. अनेकदा तांत्रिक शद्बाचा अर्थ सहज समजत नाही. मराठी माणसाला डिजिटल मीडिया सहज आणि सोप्या पद्धतीने समजून घेता यावा, यासाठी पत्रकार देवनाथ गंडाटे यांनी माहिती संकलित करून तयार केलेले पुस्तक मराठी माणसाला देणगीच ठरणार आहे. नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार व संपादक शैलेश पांडे यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांच्या प्रस्तावनेमध्ये माध्यमं कशी बदलली आणि त्याचा जगावर कसा परिणाम झाला, याचा अत्यंत सुंदर पद्धतीने आलेख मांडला आहे.

देवनाथ गंडाटे हे मुळात पत्रकार आणि वेबडिझायनर आहेत. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यताप्राप्त डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौंसिल ऑफ इंडिया या स्वनियमन संस्थेचे सदस्य आहेत. सन २००२ पासून पत्रकारितेत कार्यरत असून, चंद्रपूर, नागपूर, अलिबाग आणि विदर्भातील विविध जिल्ह्यात पत्रकारितेचा अनुभव आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे दैनिक सकाळच्या विदर्भ आवृत्तीत १४ वर्ष पत्रकारिता केली. सोबतच चंद्रपूर समाचार, चंद्रधून, कृषीवल, सकाळ आणि लोकशाही वार्ता आदी वृत्तपत्रात बातमीदार, उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक, मुख्य वार्ताहर आदी पदांचा अनुभव आहे. नागपुरातील आयटी क्रॉफ्ट कंपनीच्या माध्यमातून चंद्रपूर महानगरपालिकेत ‘कंटेंट एक्सपर्ट’ म्हणून कामाचा अनुभव पाठीशी आहे. नागपुरातील द पी.आर. टाईम्स तसेच टेक्नोव्हिजन मीडिया ॲण्ड कम्युनिकेशन कंपनीत फ्री लॉन्सर कन्टेन्ट रायटर आणि वेब डिझाइनर म्हणून कार्यरत आहेत. विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे माध्यम व डिजिटल सल्लागार तसेच स्मित डिजिटल मीडियाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

वेबसाईट डिझाईन, सोशल मीडिया आणि डिजिटल मीडिया अभ्यास ते करीत असतात. हे शिकण्यासाठी कुठल्याही कॉलेजची डिग्री किंवा सर्टिफिकेट घेतलेले नाही. केवळ अनुभव आणि प्रत्यक्ष कृतीतून केलेला अभ्यास त्यांनी लोकांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात प्रामुख्याने सोशल मीडिया आणि डिजिटल मीडिया, गूगल आणि सेवा, फेसबुकचे प्रकार, ट्विटरचे महत्व, टेलिग्रामचे फायदे, व्हाट्सएप आणि बिझनेस व्हाट्सएपमधील फरक, युट्युब आणि त्यातून होणारी कमाई, ऑनलाईन उत्पन्नाचे स्रोत आणि लोकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिलेली आहेत. इतकेच नव्हेतर नव्या तंत्रज्ञानातील चॅट जीपीटी आणि युनिक मीडिया प्लॅटफॉम यावरही प्रकाश टाकला आहे. हे पुस्तक बघून राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता अड. फिरदोस मिर्झा, सेवानिवृत्त माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनीही कौतुक केले आहे. सध्या महाराष्ट्रभरातून अनेक माध्यम प्रतिनिधी, जनसंवाद विभाग आणि व्यावसायिकांनी देखील या पुस्तकाची मागणी नोंदवली आहे.
भैरव दिवसे
मुख्य संपादक,
आधार न्यूज नेटवर्क


पुस्तक उपलब्ध:-  इको ऑफिस गावठी हेल्थ स्टोर रामाळा तलाव चंद्रपूर 



Language: Marathi
प्रकाशन वर्ष 2023
किंमत ९९ रुपये
ISBN Number 978-93-5786-520-3

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने