Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

जंगलात लपविलेल्या दोन रायफली पोलिसांच्या ताब्यात #chandrapur #gadchiroliगडचिरोली:- नक्षलवाद्यांच्या घातपाती कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षलविरोधी पथकाकडून गस्त केली जात असताना मंगळवारी दि. २१ फेब्रुवारीला एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जंगलात दोन रायफली आढळून आल्या. नक्षलवाद्यांनी त्या रायफली लपवून ठेवल्या होत्या.

सकाळी १० वाजताच्या सुमारास पेंढरी उपविभागांतर्गत जारावंडी ठाण्याच्या हद्दीतील जंगलात गडचिरोली पोलीस दल, सीआरपीएफ आणि एसआरपीएफचे अधिकारी व जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते.

यावेळी नक्षलवाद्यांनी जंगलात लपवून ठेवलेल्या दोन रायफली आढळल्या. त्यात एक सिंगल बॅरल १२ बोअर रायफल, तर दुसरी एसएसआर आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल व इतर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुजीतकुमार चव्हाण, सीआरपीएफचे पो.निरीक्षक धर्मेंद्र कुमार तथा एसआरपीएफचे पो.उपनिरीक्षक कांदळकर व जवानांनी यशस्वी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत