पोंभुर्णा येथे धरती आबा क्रांतिसूर्य बिरसा मुंडा तिन अंकी क्रांतीनाट्य प्रयोगाचे आयोजन #chandrapur #pombhurna


पोंभुर्णा:- सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन मुबंई अंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त दि. २२ फेब्रुवारी रोज बुधवारला रात्री ९.३० वाजता किरण राईस मिलच्या भव्य पटांगणावर लोकजागृती संस्था चंद्रपुर द्वारा प्रस्तुत आदिवासींच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून वयाच्या २५ व्या वर्षी शहिद झालेल्या झारखंडच्या सुपुत्राची गौरव गाथा तिन अंकी क्रांतीनाट्य धरती आबा क्रांतिसूर्य बिरसा मुंडा या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक ना.सुधीर मुनगंटीवार मंत्री वने सांस्कृतिक कार्य, मस्त्यव्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपुर-गोंदिया, अध्यक्ष खा.अशोक नेते चिमुर-गडचिरोली लोकसभा क्षेत्र, विशेष अतिथी हंसराज अहिर अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग भारत सरकार आदि मान्यवर ऊपस्थित राहणार आहेत.

या नाट्यप्रयोगाचे प्रवेश विनामुल्य आहे. तरी जनतेनी या नाट्यप्रयोगाला मोठ्या संंख्येनी ऊपस्थित राहण्याचे आवाहन विकास खरगे प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग तसेच विभीषण चवरे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि लेखक चुडाराम बल्हारपुरे, निर्माता दिग्दर्शक अनिरुध्द वनकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या