मजुराची गळफास घेऊन आत्महत्या #chandrapur #ballarpur #suicide

Bhairav Diwase

बल्लारपूर:- कोठारी येथील मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या रामचंद्र (रामल्लू) नारायन वासमवार (५५) याने कोठारी वनविभागाच्या तलावाशेजारी असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली.

आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. कोठारी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली व जावई, नातवंडे असा परिवार आहे.