सिंदेवाही बाजार समितीत काँग्रेसला बहुमत #Chandrapur #sindewahi


सिंदेवाही:- जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा शनिवारी निकाल जाहीर झाला असून यामध्ये सिंदेवाही कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस प्रणित पॅनलने १८ पैकी ११ जागा जिंकत निर्विवाद बहुमत प्राप्त केले.

१८ सदस्यसंख्या असलेल्या सिंदेवाही बाजार समितीवर यापूर्वी भाजपा प्रणित पॅनलचे वर्चस्व राहिले आहे. मात्र यावेळी या विभागाचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आणि निवडणुकीत रंग भरला. तेवढीच प्रतिष्ठा भाजपा कडून जोपासण्याचे प्रयत्न करण्यात आले. दोन्ही पॅनलनी साम दाम दंड भेद ही नीती वापरून निवडणूक लढवली. यात सहकार क्षेत्रातील ११ जागेपैकी ६ जागा, ग्राम पंचायत गटातील ४ पैकी ३ जागा , आणि व्यापारी गटातील २ पैकी दोन्ही जागा अशा एकूण ११ जागा जिंकत काँग्रेस प्रणित पॅनलने कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपला कब्जा मिळविला आहे. याउलट सत्ताधारी भाजपा प्रणित पॅनलला केवळ ७ जागेवर समाधान मानावे लागले.

विजयाच्या यशासाठीआमदार विजय वडेट्टीवार यांचे मार्गदर्शनात काँग्रेस तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे, शहराध्यक्ष सुनील उट्टलवार, वीरेंद्र जैस्वाल, राहुल पोरेड्डीवर, प्रशांत बनकर, गणेश गोलपल्लीवार, इत्यादींनी परिश्रम घेतले. नवनिर्वाचित सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत