Gondwana University's Winter 2025: गोंडवाना विद्यापीठ: २८ ऑक्टोबरला सुरू होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या!

Bhairav Diwase


गडचिरोली/चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठाने (Gondwana University) शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील हिवाळी २०२५ (Winter 2025) च्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


यापूर्वी, या परीक्षा २८ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार होत्या आणि त्यांचे वेळापत्रकही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या (Examination and Evaluation Board) तातडीच्या सभेत यासंदर्भात ठराव पारित करण्यात आला.


ठरावानुसार, २८ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या असून, त्या १७ नोव्हेंबर २०२५ पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर (Official Website) प्रसिद्ध करण्यात येईल, असे विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, पदव्युत्तर विभाग प्रमुख, विद्यार्थी आणि संबंधितांना कळवले आहे.