Sudhir mungantiwar: आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे उमरी पोतदारमध्ये आरोग्य सेवेचा नवा अध्याय

Bhairav Diwase

चंद्रपूर:- नागरिकांना आरोग्य सेवा दर्जेदार आणि सहज उपलब्ध व्हाव्यात, याच एकमात्र हेतूने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात आरोग्य सेवेचे जाळे निर्माण केले. यात पुन्हा आता आरोग्य सेवेची भर पडणार असून आरोग्य सेवेचा नवा अध्याय जोडला जाणार आहे. पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे भव्य प्राथमिक आरोग्य केंद्र संकुल आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले असून, राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता या आरोग्य केंद्राचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाशजी आबिटकर हे दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Pombhurna 


ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून प्रधानमंत्री खनिज कल्याण योजना (सन २०१९-२०) अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र संकुल साठी ८ कोटी ७५ लाख २५ हजार रुपये आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी (सन २०२४-२५) अंतर्गत स्मार्ट आरोग्य केंद्रासाठी १ कोटी ३२ लाख ७७ हजार ४९० रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. या निधीतून उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र संकुल आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र, उमरी पोतदार यांचे भव्य उद्घाटन दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. Sudhir mungantiwar 


उमरी पोतदार परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या. किरकोळ आजारासाठीसुद्धा बाहेरगावी जाऊन उपचार घ्यावे लागत होते. या समस्येची दखल घेत पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटना प्रसंगी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांना आरोग्य केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवत आ.मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे आरोग्य केंद्र साकार झाले असून, उमरी पोतदार आणि परिसरातील शेकडो नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहेत. Pombhurna hospital 


उमरी पोतदार परिसरातील हे आरोग्य केंद्र म्हणजे ग्रामीण भागातील आरोग्यसेवेच्या नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे. अत्याधुनिक सुविधा, स्वच्छ वातावरण आणि आधुनिक उपचारपद्धतींसह हे केंद्र १७ ऑक्टोबर पासून कार्यान्वित होणार आहे. ग्रामीण भागातही शहरी दर्जाच्या आरोग्य सेवा पोहोचविण्याचा संकल्प आमदार मुनगंटीवार यांनी या माध्यमातून साकार केला आहे. Umari potdar hospital 


या सोहळ्याला उद्घाटक म्हणून आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Adhar News Network 


चंद्रपुरात आरोग्य सुविधांची क्रांती

आरोग्यसेवा जनतेचा अधिकार मानून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अर्थमंत्री असताना त्यांनी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्याकडून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाला एमआरआय मशीनसाठी ७.५ कोटी रुपयांचा निधी आणला, १.५ कोटी रुपयांची मोबाईल कॅन्सर व्हॅन, जिल्ह्यात १३ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र, ३२ स्मार्ट आरोग्य केंद्र,६ स्मार्ट रुग्णालय,मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल उभारणी करण्यासोबत नेत्र व आरोग्य शिबिरे राबवून हजारो नागरिकांना दिलासा दिला आहे. “आरोग्यदायी चंद्रपूर” हा त्यांचा संकल्प त्यांनी कायम प्रत्यक्षात उतरवून दाखवला आहे, हे विशेष.