Top News

डॉट बॉलऐवजी झाडाचं चित्र? वाचा नक्की कारण काय #chandrapur #IPL #tataIPLmatch


ना. सुधीर मुनगंटीवारांनी मानले BCCI चे आभार


https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत प्लेऑफला मंगळवारपासून (23 मे) सुरुवात झाली आहे. प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना मंगळवारी गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळवला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सला पराभवचा सामना करावा लागला. तर चेन्नई सुपर किंग्स फाईनल ला पोहचली आहे. दरम्यान, टीव्हीवर आणि ऑनलाईन हा सामना पाहाताना अनेक चाहत्यांना निर्धाव चेंडूच्या (डॉट बॉल) जागेवर झाडाचं चित्र दिसलं असेल. त्यामुळे अनेक चाहते असं झाड का दाखवलं जात आहे, असा प्रश्नही पडला असेल.
पण यामागे एक कौतुकास्पद कारण म्हणजे टाटा समुह आणि बीसीसीआयचा पर्यावरणाच्या दृष्टीने सुरु केलेला हा एक उपक्रम असून या उपक्रमांतर्गत आयपीएलमधील प्लेऑफच्या सामन्यांमध्ये प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 500 रोपांचे रोपण केले जाणार आहे. याच उपक्रमामुळे सामन्यादरम्यान निर्धाव चेंडू दर्शवताना झाडाचे चित्र चाहत्यांना दिसत होते.
ना. सुधीर मुनगंटीवारांनी मानले BCCI चे आभार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने प्लेऑफ सामन्यांमध्ये खेळल्या जाणार्‍या प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 झाडे लावणार असल्याचे गुजरात टायटन विरुद्ध चेन्नई सुपर किंग या सामन्यादरम्यान समालोचकांद्वारे जाहीर केले. BCCI ने घेतलेला हा निर्णय खरंच कौतुकास्पद आहे. निसर्गसंपदेचे महत्व लक्षात घेऊन घेतलेल्या या निर्णयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

American Wholesale Book dítě hvězdy is a wholesale book and distribution service located in Florence, AL. A.W.B.C. provides distribution services for.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने