https://www.adharnewsnetwork.com
Google ads.
पुणे:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीच्या परीक्षेच्या निकाल आज जाहीर झाला आहे. लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालकांचं बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलं होते.
बारावीचा निकाल दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे. राज्यात 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती. सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
बारावीचे विद्यार्थी https://www.mahahsscboard.in mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, या संकेतस्थळावर आपले निकाल पाहू शकतात.
यासाठी विद्यार्थ्यांना बारावीचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर हॉल तिकीट क्रमांक आणि इतर डिटेल्स भरल्यानंतर तुमचा निकाल तु्म्हाला कळेल. विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोड देखील करु शकतात.