वादळात चिमुरड्याची दुकान वाचवण्यासाठी धडपड #viralvideo #socialmediavideo

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

एखादा व्हिडीओ कधी कोणत्या कारणाने व्हायरल होईल सांगता येत नाही. आज प्रत्येकाच्या हातात मोबाइल असल्याने त्यात टिपलेला एखादा क्षणही असाच अचानक व्हायरल होता. सोशल मीडियावर सध्या अशाच एका व्हिडीओची चर्चा आहे, ज्यामध्ये चिमुरडा आई-बापासह वादळाशी लढा देत आहे.


व्हिडीओत चिमुरडा वादळात आपल्या आईला मदत करताना दिसत आहे. सोसाट्याचा वारा सुटलेला असताना दुकानावर असणारी ताडपत्री उडून जाऊ नये यासाठी चिमुरडा ती हाताने पकडून उभा असतो. यावेळी त्याची आई मागे आवराआवर करत असल्याचं दिसत आहे. त्याची आई रशीने सर्व सामान बांधत असते. याचवेळी प्लास्टिकची खुर्ची उडून गेल्याचं त्याला दिसतं. नंतर चिमुरडा त्या वादळात धावत जातो आणि खुर्ची घेून पुन्हा आईजवळ येतो.

सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये नागालँडचे पर्यटन आणि उच्च शिक्षण मंत्री तेमजेन इमना अलांग (Temjen Imna Along) यांचाही समावेश आहे. तेमजेन इमना अलांग हे नेटकऱ्यांचे आवडते राजकीय नेते असून ते सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते नेहमी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. त्यांनी चिमुरड्याचा हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.


तेमजेन इमना अलांग यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे की, "जिम्मेदारी समझने के लिए उम्र कि जरूरत नहीं, हालात ही सीखा देता हैं!". 31 सेकंदाच्या या व्हिडीओला 3 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं असून 14 हजाराहून अधिक लाईक्स आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत