बल्लारपूर:- शहरातील सामाजीक कार्यकर्ते, स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीत निस्वार्थ पने झटनारे तथा युवा पत्रकार पराग सुरेश गुंडेवार यांंची सामाजीक बांधीलकी, कोरोना काळातील त्यांचे कार्य,पोलिस मित्र अध्यक्ष म्हणून त्यांनी बल्लारपूर तालुक्यात केलेल्या कामगिरी ची दखल घेऊन पराग सुरेश गुंडेवार यांची मानवाधिकार सहाय्यता संघ भारत शाखा बल्लारपूर च्या तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती मानवाधिकार सहाय्यता संघ भारत चे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोनुु सिंग यांच्या आदेशानुसार व बल्लारपूर चे माजी तालुका अध्यक्ष तथा शहर अध्यक्ष रोहन जयंत कळसकर यांच्या सुचनेनुसार मानवाधिकार साहयाता संघ भारत चे राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवि धारणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.
या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वांन कडून अभिनंदन व पुढील कामाच्या वाटचाली करिता शुभेच्छा प्रधान केल्या जातात आहे.