गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग #chandrapur #gadchiroli #Bhandara

Bhairav Diwase

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
भंडारा:- जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाच्या (Gosekhurd Dam) पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून जोरदार (Rain) पावसानं हजेरी लावली आहे. सकाळपासून गोसीखुर्द धरणाचे पाच गेट अर्धा मीटरनं उघडण्यात आली आहेत.  तर रात्रौच्या सुमारास गोसीखुर्द चे 17 दरवाजे उघडले असल्याची माहिती आहे.

गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस झाल्यामुळे तसेच ऊर्ध्व भागातील धापेवाडा बॅरेजचा विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील तासात धरणाचा विसर्ग 1500 ते 2000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल तरी नदी काठांवर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे.

याचा परिणाम गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यावर होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.