राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळ माझ्याकडेच; उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार म्हणाले.... #Chandrapur #Maharashtra #Mumbai



मुंबई:- अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ उपस्थित होते. यावेळी अजितदादांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला.

अजित पवार म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही काम करणार आहोत, घड्याळ चिन्हावरच आम्ही निवडणुका लढणार आहोत. देशपातळीवरील सध्या जी परिस्थिती आहे, त्याच्या विचार केला असता विकासाला महत्व दिले पाहिजे, हे सर्व सहकाऱ्यांचे मत होते,"

"नऊ वर्षांपासून मोदी सरकार चांगले काम करीत आहे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.मोदींमुळे देशाचा विकास होत आहे. राज्यामध्ये विकासाला महत्व दिले पाहिजे, त्यामुळे राज्यात मजबूत खंबीर नेतृत्वाची गरज आहे. केंद्रीय निधी कसा मिळेल, यासाठी प्रयत्न केला जाईल," असे अजित पवार म्हणाले.

सर्वांनी मिळून हा निर्णय..

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुसंख्य आमदारांनी जाण्याचा निर्णय घेतला.जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो. बहुतांश नेत्यांना माझा निर्णय मान्य. पक्षाचे चिन्ह व नाव आमच्याकडेच, आम्ही पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवू. पक्ष अधिक मजबूतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार. सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.

राज्यपाल महोदयांनी आम्हाला शपथ दिली. अजूनही मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. त्यातही इतरांना मंत्रिपदे मिळणार. अनेक दिवस चर्चा सुरू होती. शुक्रवारी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या वर्धापन दिनाला भूमिका मांडली होती. इथून पुढे तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रांतात नवे कार्यकर्ते पुढे आणले पाहिजे तसा आमचा प्रयत्न आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत