तेंदुपान तोडण्यासाठी गेलेल्या मजुरांच्या गाडीचा अपघात #accident pombhurna #chandrapur

Bhairav Diwase
0
अकरा मजूर व ड्रायव्हर गंभीर जखमी; सहा जणांची प्रकृती चिंताजनक

पोंभूर्णा:- पोंभूर्णा येथील तेंदुपान मजूर जुनोन्याच्या जंगलात तेंदुपत्ता तोडण्याचं काम आटोपून पिकअप गाडीतून पोंभूर्णा गावाकडे जात असताना सातारा तुकूम जंगलातील वळण रस्त्यावर विरूद्ध दिशेने येणाऱ्या टाटा योद्धा गाडीने जोरदार धडक दिली या धडकेत तेंदुपान तोडणारे अकरा मजूर व ड्रायव्हर गंभीर जखमी झाले.यात सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे.सदर घटना दि.२५ मे शनिवारला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली.

सध्या तेंदुपत्ता संकलन हंगाम सुरू आहे.खेड्यापाड्यातील लोकं सकाळी तेंदुपान तोडण्यासाठी जंगलात जात असतात.पोंभूर्णा येथील नऊ महिला व दोन पुरुष मजूर पोंभूर्णा येथून तेंदुपान तोडण्यासाठी जुनोन्याच्या जंगलात गेले होते. हे सर्व मजूर तेंदुपान संकलन करून पोंभूर्णा गावाकडे परत येत असताना सातारा तुकूम जंगल परिसरातील वळण रस्त्यावर विरूद्ध दिशेने येत असलेल्या भरधाव टाटा योद्धा MH 34 BG 7880 गाडीने तेंदुपान मजुरांना घेऊन जाणाऱ्या सुझुकी पिक अप MH 34 BG 4649 या गाडीला जोरदार धडक दिली यात गाडीतील अकरा मजूर व ड्रायव्हर गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.यातील सहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने चंद्रपूरला हलविण्यात आले.तर यातील दोघांना नागपूरला रेफर करण्यात आले.चार जणांना पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूरला पाठविण्यात आले.सर्व जखमींवर उपचार सुरू आहे.

अपघातातील जखमींची नावे

शांताबाई सोनुले (५५) ,पंचफुला गुरूनुले (४२ ),कविता मानकर (४८), लीना फुलझले (४८), प्रकाश मानकर (६२), समाधान मानकर (५२), गीता ऊराडे (४०) ह्याची प्रकृती चिंताजनक असून यातील शांताबाई सोनुले,पंचफुला गुरूनुले, यांना नागपूरला रेफर करण्यात आले आहे.गंभीर जखमींमध्ये बेबी ऊराडे(५०), वैशाली मानकर (४२) व योगेश गुडलावार (ड्रायव्हर) (३०),तर ऊषा मानकर व पुष्पा मानकर किरकोळ जखमी आहेत.

तेंदुपान तोडण्यासाठी गेलेल्या मजुरांना संपूर्ण वैद्यकीय खर्च व आर्थिक मदत तेंदुपान ठेकेदारांनी तात्काळ द्यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)