Top News

वडिलाच्या स्मृतीप्रीत्यर्थ सुरू केली पाणपोई #chandrapur #pombhurna

पोंभूर्णाः- उन्हाच्या उकाड्याने सर्व नागरिक त्रस्त आहेत. तापमान ४४ अंशावर गेले आहे. पोंभूर्णा शहरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक (बस स्टॅण्ड चौकातील) प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे सामाजिक सेवेचा भाव जपत प्रवासी व वाटसरूंना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील वर्दळीच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक (बस स्टॅण्ड चौकात) नगरसेवक दर्शन गोरंटिवार यांनी वडिल स्व. गजानन गोरटिवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाणपोई सुरू केली आहे.

तहानलेल्यांना पाणी पाजणे हे पुण्याचे काम आहे. उन्हाचा तडाखा दिवसभर जाणवत पोंभूर्णा शहरात तापमान वाढत आहे. गर्मीने नागरिक बेजार होत आहेत. अबालवृद्ध महिला, प्रवासी, वाटसरू यांना पाण्यासाठी भटकंती करू नये यासाठी सामाजिक बांधिलकीतून व सेवाभाव जपत नगरसेवक दर्शन गोरंटिवार यांनी बडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक (बस स्टॅण्ड चौकात) पाणपोई सुरू केली.
यावेळी नगरपंचायतचे नगराध्यक्ष सुलभा पिपरे, नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार, माजी पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, नगरसेवक दर्शन गोरंटिवार, भाजपा नेते रवि मरपल्लीवार, चरणदास गुरूनुले, मोहन चलाख, गुरुदास पिपरे, नगरसेवक अभिषेक बद्दलवार,धम्मा निमगडे, खुशाल कावळे, प्रशांत उराडे, यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने