भूस्खलनग्रस्तांना पट्टेवाटप व पुनर्वसनासंदर्भात बैठक #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- येथील भूस्खलनग्रस्तांची भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्यासह न. प. चे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांच्याशी न. प. कार्यालयात सोमवार, ८ जुलै रोजी पट्टेवाटप व पुनर्वसनासंदर्भात बैठक पार पडली. येथील अमराई वार्डातील भूस्खलनग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नियोजित केलेली वेकोलि वसाहतीच्या शिवनगर जवळ जागा आहे.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे अमराई वार्डातील भूस्खलनबाधित कुटुंबीयांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या भूस्खलनबाधितांना जागेचे पट्टे मिळवून देण्यासाठी जि.प. चे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पाठपुरावा केला होता.

महसूल व वन विभागाने आपत्तीप्रणव गावाचे पुनर्वसनांतर्गत अमराई वार्डातील भूस्खलनामुळे बाधित कुटुंबीयांच्या पुनर्वसनाकरिता येथील शासकीय जमीन स.नं. २९/१ आराजी ५९. ४७ हे. आर जागेपैकी २. ४० हे. आर (६ एकर) जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने १ नोव्हेंबर रोजी निर्णय घेतला आहे.

त्याअनुषंगाने भूस्खलनग्रस्तांची भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्यसह न. प. चे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांच्याशी पट्टेवाटप व पुनर्वसनासंदर्भात बैठक झाली बैठकी दरम्यान पट्टेवाटप व पुनर्वसनासंदर्भात चर्चा करण्यात आली.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, न. प. चे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार व अमराई वार्डातील महिला उपस्थित होत्या.