कोरपना:- युगचेतना ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था संचालित कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाशी संलग्नित प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गदचांदुर येथे 9 जुलै ते 15 जुलै दरम्यान आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे राष्ट्रीय महामार्गाचे मा. ॲड .डॉ. पूनमकुमार अर्जापुरे यांच्या शुभहस्ते उदघाटन थाटात झाले.
कार्यशाळेचे उदघाटक ऍड. डॉ. पूनम अर्जापुरे यांनी एम.पी.ए.सी , यु पी.ए.सी व इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वजन सहभागी होतात पण ह्या परीक्षेचा आवाका न समजून घेता परीक्षा देतात. त्यामुळे त्यांना अपयशाचा सामना करावा लागतो. पण अभ्यासात सातत्य व ध्येय समोर ठेवल्यास यश हमाखास मिळते, असे प्रतिपादन त्यांनी उदघाटन पर भाषणात केले.
कार्यशाळेचे अध्यक्ष प्रेरणा कॉलेजचें उपाध्यक्ष प्रसिद्ध समाजसेवक मा.बालाजीभाऊ पुरी होते. कार्यशाळेस प्रामुख्याने सत्कारमूर्ती मा.नामदेवराव ठेगणे सर,मा. संजय मेंढी, मा. रमेश राठोड सर, मा. अरविंद मुसने सर, प्राचार्य नानेश्वर धोटे उपस्थित होते.