Brijbhushan Pazare: ब्रिजभुषण पाझारे अपक्ष निवडणूक लढणार!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला असून भाजपाकडून किशोर जोरगेवार यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र ब्रिजभुषण पाझारे हे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र ऐनवेळी त्यांना डावलून आ. किशोर जोरगेवार यांना पक्षाने उमेदवारी दिली.

नाराज असलेले ब्रिजभुषण पाझारे आता अपक्ष लढणार असून ते आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे ब्रिजभुषण पाझारे भाजपा पक्षातून बंडखोरी करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. ना. सुधीर मुनगंटीवार व पक्षश्रेष्ठी हि बंडखोरी रोखण्यात यशस्वी होणार का हे बघावे लागणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीतून बंडखोरी होत असल्याने मतदार आपला आमदार कुणाला करतील हे 23 नोव्हेंबरला कळणार.