Arrest: घरफोडी करणारा आरोपी पोलीसांच्या ताब्यात

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपुर शहर परीसरात डि.एड कॉलेजच्या मागे कांती चौक याबुपेठ चंद्रपुर येथे राहनार रजनी गौतम जिवने वय ५२ वर्ष या होमगार्ड असुन होमगार्ड कॅप करीता तुकुम येथे दि. १७/१२/२०२४ हजर होती व त्यांचे पती घरी एकटे राहत होते. फिर्यादीचे पती दि. २२/१२/२०२४ रोजी पहाटे ०५:०० नेहमी प्रमाणे उठुन फिरायला गेले, व ०७:०० वा. घरी परत आले असता घराला लावलेला कुलुप कोन्डा तुटलेला व घरातील अलमारीतील सामान अस्थव्यस्त घरात पसरलेले व अलमारीच्या लाम्कर मंध्ये ठेवलेले सोन्याचे दागीने १) ०४ ग्रॅम सोन्याचे कानातले टॉप्स कि. २८,०००/- रू २) ०२ ग्रॅम वजनाचे ६ गहु मणी कि. १४,०००/- रू असा एकुण ४२,०००/- रू चा माल दिसुन आला नाही. तेव्हा कोणीतरी अज्ञात चोराने घराचा कुलुपकोन्डा तोडुन घरातील अलमारीतील सोन्याचे दागीने चोरी केले असावे अश्या फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोस्टे अपराध क. १०४४/२०२४ कलम ३३१ (३),३३१ (४),३०५ (अ) BNS अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

गुन्हयाचे तपासात अज्ञात आरोपीचा शोध घेत असता मुखबीरच्या माहीती वरून पोस्टे रेकॉर्डवरील आरोपी नामे आशिष उर्फ जल्लाद अक्रम शेख वय २१ वर्ष रा. फुकट नगर संविधान चौक चंद्रपुर यास ताब्यात घेवुन गुन्हया सबंधाने विचारपुस केली असता. आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपी कडुन गुन्हयात चोरी केलेले सोन्याचे दागीने १) ०४ ग्रॅम सोन्याचे कानातले टॉप्स कि. २८,०००/- रू २) ०२ ग्रॅम वजनाचे ६ गहु मणी कि. १४,०००/- रू असा एकुण ४२,०००/- रू चा माल. जप्त करून गुन्हा अवघ्या काही तासात उघडकीस आनला.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री मुमंक्का सुदर्शण सा. मा.अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके यांचे नेतृत्वातखी एपीआय बेसाणे पोउपनी संदीप बच्छीरे, मपोहवा भावना रामटेके, पोहवा सचीन बोरकर, संतोषकुमार कनकम, नापोका कपुरवंद खैरवार, पोका ईम्रान खान, राजेश चिताडे, दिलीप कुसराम, रूपेश रणदिवे, ईर्शाद खान, विक्रम मेश्राम, यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोषकुमार कनकम, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर करीत आहे