Handball Tournament: गोंडवाना विद्यापीठस्तरीय हॅन्डबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाने पटकविला तृतीय क्रमांक

Bhairav Diwase
चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन मुलांच्या व मुलींच्या हॅन्डबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन हॅन्डबॉल स्पर्धा ब्रम्हपुरी येथील एन. एच. महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेकरिता चंद्रपूर व गडचिरोली परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या संघानी सहभाग घेतला.

या हॅन्डबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलांच्या व मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. तृतीय क्रमांक खेचून आणण्याकरिता मुलींच्या संघात दीपाली शेंडे, मयुरी आलम, स्नेहा गाणफाडे, खुशी चहारे, आरती बारसागडे, कीर्तना इदुलवार, मीना कृष्णपल्लीवार, मोनिका गराड, मयुरी ताजने, सलगम गुप्ता, अंजली नागपुरे, दिव्या दुर्गे यांनी आपल्या सुरेख खेळ, रणनीती व कौशल्याचे प्रदर्शन केले. तसेच मुलांच्या संघात तृतीय क्रमांक खेचून आणण्याकरिता हिमांशू सरोज, विनित गजभिये, समीर सोनवणे, बॉबी बगूली, अरिहंत यादव, वैभव ननावरे, वेदांत धरणे, लॉरिक यादव, आदित्य राजभर, आशिष जाधव, मयूर वाकडे, अभिषेक मेश्राम यांनी आपल्या सुरेख खेळ, रणनीती व कौशल्याचे प्रदर्शन केले.

दरम्यान संघाच्या या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, प्रभारी प्रबंधक विनोद चोपावर, कला विभाग प्रमुख डॉ. सुनीता बन्सोड, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. विजय वाढई, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. राहुल सावलीकर, संगणक विभाग प्रमुख डॉ. एस. बी. किशोर, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुष्पांजली कांबळे, प्रा. विकी पेटकर, हनुमंतू डंभारे, निलेश बन्नेवार, कु. नागु कोडापे प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.