Chandrapur police: चंद्रपूर पोलिसांनी लुटमारीचा प्रयत्न उधळून लावला!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात मालाविरूद्ध व शरिराविरूद्ध चोरी व लुटमारीचे गुन्हे करणारे लोकांना प्रतिबंध करून त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्या बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन, यांनी रामनगर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. असिफराजा शेख यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. असिफराजा शेख यांना रामनगर पोलीस स्टेशनचे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अशा प्रकारचे गुन्हे करणा-या लोकांबाबत गोपनीय माहिती काढून अशा प्रकारचे दाखल गुन्ह्यांची उकल करण्याबाबत आदेशीत केले होते.

त्यानुसार रामनगर पोलीस स्टेशनच्या शोध पथकातील अधिकारी व अंमलदार पो.स्टे. रामनगर हद्दीत दिनांक- 09/04/2025 रोजी रात्री 10.30 वा. पेट्रोलींग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, ईरई नदीच्या काठालगत छोटा काश्मीर, ठक्कर कॉलनी, चंद्रपूर येथे अंधारात सहा ते सात लोक मोटारसायकलवर थांबून असून त्यांचेकडे धारदार शस्त्रे आहेत. त्या अनषंगाने पथकाने बातमीची खात्री करण्यासाठी तेथे जाऊन लांबूनच चंद्राचे उजेडात पाहणी केली असता तेथे तीन मोटरासायकलवर सात लोक हातात काहीतरी धारदार वस्तू घेऊन कशाचेतरी नियोजन करीत असल्याने दिसून आले. त्यावरून पथकाने पंचासमक्ष त्यांचेवर छापा घालून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यामध्ये (१) रेहान जमीर शेख, वय १९ वर्षे, रा. जटपुरा गेट वार्ड, चंद्रपूर, (२) सुजल महेंद्र चांदेकर, वय १९ वर्षे. फुले चौक, बाबूपेठ, चंद्रपूर (३) इशांत प्रमोद कुंभारे, वय १९ वर्षे, धंदा मजुरी रा. अंचलेश्वर गेट, चंद्रपूर व एका विधीसंघर्षग्रस्त बालकास जागीच पकडून ताब्यात घेतले. त्यांचेसोबतचे तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. 

पकडलेल्या लोकांना विश्वासात घेऊन तिथे थांबण्याचे कारण विचारले असता त्यांनी लुटमारीच्या उद्देशाने तेथे थांबल्याचे कबूली दिली. त्यावरून पंचासमक्ष त्यांची चंद्राचे व मोबाईलचे लाईटचे उजेडात अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात दोन धारदार तलवारी, एक लोखंडी पट्टी एक टेस्टर व तीन मोटारसायकली असा एकूण २,३१,४५०/- रू. किं.च्या मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्यातील आरोपींना अटक केली असून फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांचेकडून अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन व मा. अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख, सहा. पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस अंमलदार आनंद खरात, सचिन गुरनुले, लालू यादव, शरद कुडे, पेतराज सिडाम, प्रशांत शेंदरे, मनिषा मोरे, हिरा गुप्ता, प्रफुल पुप्पलवार, पंकज ठोंबरे, रविकुमार ढेंगळे, संदिप कामडी, ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे.