Gambling games: चंद्रपूरातील एन. डी. हॉटेलमध्ये रंगला जुगाराचा खेळ

Bhairav Diwase

चंद्रपूर:- दिनांक २७ एप्रिल, २०२५ रोजी एन. डी. हॉटेल चंद्रपूर येथील रुम नंबर ११२ मध्ये काही इसम ५२ ताश पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे मिळालेल्या गोपनिय माहितीवरून सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या रुम मध्ये एकूण १० आरोपी ५२ ताश पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे मिळून आल्याने त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांचेकडून एकूण ३,१०,६१०/- रुपये रोख रक्कम मिळून आल्याने त्यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, अमोल काचोरे पोलीस निरीक्षक यांचे नेतृत्वात सपोनि श्री बलराम झाडोकार, पोउपनि श्री संतोष निंभोरकर, पोहवा जय सिंह, चेतन गज्जलवार, पोअं. प्रशांत नागोसे, शशांक बादामवार, मिलींद जांभुळे, नितीन रायपुरे, किशोर वाकाटे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.