Click Here...👇👇👇

Seven Sisters Hills: सातबहिणी डोंगर पर्यटन स्थळ पुन्हा सुरू

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील प्रसिद्ध सातबहिणी डोंगर पर्यटन स्थळ, पेरजागढ आणि सोनापूर गावांच्या नजीक असलेले, आता पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेले हे स्थळ प्रशासनाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


तळोधी (बा.) पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या या पर्यटन स्थळावर मान्सून कालावधीत, विशेषतः हवामान खात्याने दिलेल्या ऑरेंज किंवा रेड अलर्टच्या पूर्वसूचनेनुसार, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे स्थळ बंद ठेवण्यात आले होते.


पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, चंद्रपूर पोलिसांनी पुढील आदेश येईपर्यंत हे पर्यटन स्थळ बंद राहणार असल्याचे यापूर्वी कळवले होते. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने आणि कोणताही धोका नसल्याने, सातबहिणी डोंगर पर्यटन स्थळ पुन्हा एकदा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. यामुळे स्थानिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.