Click Here...👇👇👇

Wainganga River Flood:- वैनगंगेच्या पुरामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील 8 गावं प्रभावित!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावं प्रभावित झाली आहेत. त्यामुळे बचाव पथकांसह जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. सध्या गोसीखुर्द धरणांमधून सध्या मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे याचा फटका चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रम्हपुरी तालुक्याला बसलाय. नदीकिनारी असलेली लाडज, पिंपळगाव भोसले, भालेश्वर, चिखलगाव, अरहेर, नवरगाव आणि बेलगाव अशी गावं प्रभावित झाली आहेत. सध्या 14 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून गरज पडल्यास आणखीही लोकांना रेस्क्यू केल्या जाऊ शकतात.


वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने होत असून ब्रह्मपुरी तालुक्यातल्या अनेक नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मुडझा-गांगलवाडी आणि गांगलवाडी-आरमोरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाल्यास तालुक्यात पूर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.