चंद्रपूर:- स्थानिक गुन्हे शाखेने देह व्यापार प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. दिनांक १९ ऑगस्ट, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुक्तिनगर, मच्छीनाला येथील रहिवासी अमर शशिकांत द्विवेदी (वय ३१) याच्या घरी छापा टाकण्यात आला.
छाप्यादरम्यान घरात एक महिला आढळली. चौकशी केली असता, अमर द्विवेदी हा आर्थिक फायद्यासाठी तिच्याकडून देह व्यापार करून घेत असल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ त्या महिलेची सुटका केली. आरोपी अमर द्विवेदी याच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात कलम ३, ४, ५, ७ महिला व मुलींचे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम आणि PITA अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस अधिकारी अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या पथकात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, सफौ धनराज करकाडे, पोहवा चेतन गज्जलवार, सुरेंद्र महतो, पोअं प्रफुल्ल गारघाटे, सुमित बरडे, शशांक बादामवार, मपोअं छाया निकोडे, अपर्णा मानकर, उषा लेडांगे, विजयमाला वाघमारे, निराशा तितरे व चापोअं मिलींद टेकाम यांचा समावेश होता.