Gadchiroli News : १९ वर्षीय तरुण गेला पुरात वाहून

Bhairav Diwase
भामरागड:- भामरागड तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान याच भामरागड तालुक्यात एक दुःखद घटना देखील समोर आली असून काल १८ ऑगस्ट रोजी कोडपे गावातील १९ वर्षीय लालचंद कपिलसाय लकडा दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास खंडी नाला ओलांडताना नाल्याच्या पुरामध्ये वाहून गेला आहे.


प्रशासनातर्फे सदर व्यक्तीचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांनी सांगितले आहे.