गोंडपिपरी:- गडचिरोली जिल्हा सध्या स्टील हब म्हणून परिचित आहे.याच जिल्ह्याच्या सीमेवर गोंडपिपरी तालुका असून गडचिरोली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोहखनिजाची वाहतूक केले जात असलेले हायवे गोंडपिपरी तालुक्यातून चालतात.अशावेळी शासनाने त्यांना सदर खनिजाची वाहतूक करत असताना वाहतूक परवाना दिल्यानंतर त्यात मार्ग ठरवून दिले असतात.त्याच मार्गाने खनिजाची वाहतूक होणे बंधनकारक आहे.मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक धारक त्यांच्या परवाण्यावर उल्लेख नसताना आपल्या वाहतुकीचा मार्ग मनमर्जिने गोंडपीपरी - खेडी मार्ग वळवला आहे.
सद्या स्थितीत पाऊस आणि जळ वाहतुकीमुळे त्यांच्या आष्टी-चामोर्षी मार्गाची अवदशा झाली आहे.त्यामुळे याला पर्याय व्यवस्था म्हणून त्यांनी चामोर्शी रस्त्याची वाहतूक गोंडपिंपरी - खेडी मार्गाने सुरू केली आहे.हा पूर्णतः बेकायदेशीर प्रकार असून त्यांच्या वाहतुकीसाठी हा मार्ग अजूनही तयार झाला नाही आणि तशी या रस्त्याची गुणवत्ता देखील नाही.दरम्यान गोंडपिपरी - खेडी मार्गावरून ही वाहतूक दिवस रात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे.अशावेळी सदर मार्गावर कुठ्याच प्रकारे सुरक्षा व्यवस्था निर्माण केली नाही.
पावसामुळे या मार्गाची अवस्था दयनीय असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे.त्यामुळे खनिज वाहतुकीच्या भरधाव चालणाऱ्या गाळ्यांवर कुणाचे नियंत्रण नसल्यामुळे हा मार्ग सद्या स्थितित अपघाताला निमंत्रण देणारां ठरला आहे.अशावेळी सदर मार्गावरील अवैध्य वाहतूक बंद करण्यात यावी ,सदर मार्गावर गाड्यांची होणारी अवैद्य पार्किंग नंतर त्या वाहनावर निमनुसार कारवाई करावी किंव्हा मार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने तालुक्याची सीमा लक्षात घेता.बांधकाम विभाग कार्यालय,खरारपेठ व वढोली या पॉइंट वर मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडूरवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
आठ दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास सुरजागडच्या या जीवघेण्या प्रकाराविरोधात वढोलीत खेडी - मुल मार्ग बंद करून धोरणाचा जाहीर निषेध करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दि.(११)गुरुवारी तहसीलदार शुभम बहाकर,ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला.
यावेळी तालुका प्रमुख सुरज माडुरवार,युवासेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते, शहर प्रमुख विवेक राणा,युवासेना तालुका उपप्रमुख गौरव घुबडे,रवींद्र कोहपरे,अमोल कुकुडकर,संजय कोहपरे,विनोद अलोणे,सुधीर मेश्राम,किशोर मंत्रीवार,सुरज भोयर,गुरुदास अलोने यांची उपस्थिती होती.
सुरजागडची वाहतूक परवण्यानुसार ठरवून दिलेल्या रस्त्याने न करता गोंडपिपरी-खेडी मार्गाने सुरू आहे.बेकायदेशीर होणारी जड वाहतूक तात्काळ थांबवा.रस्त्याची दुरावस्था होत आहे.या रस्त्याची गुणवत्ता देखील योग्य नाही.अपघाताचे प्रमाण वाढले आरटीओंनी लक्ष द्यावे.तालुका प्रशासनाने समस्येची दखल घेऊन मार्ग काढावा.वाहतूक बंद करा किंव्हा नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गोंडपिपरी ते वढोली पर्यंत सुरक्षा निर्माण करावी.अन्यथा आठ दिवसात गावात चक्काजाम आंदोलन करणार.
सुरज माडूरवार शिवसेना (उबाठा)
तालुका प्रमुख गोंडपिपरी)