गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षित युवक-युवतींच्या सर्वांगिण विकासासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून नेहमीच विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जात असते, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या रोजगार प्रशिक्षणांचा देखील समावेश आहे. पोलीस दलात नोकरी मिळवून आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने प्रयत्नशिल असणाऱ्या युवकांसाठी गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदरचे प्रशिक्षण आज पुर्ण झाल्याने प्रशिक्षणाथ्यांचा निरोप समारंभ एकलव्य हॉल, पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे पार पडला.
दि. 06/08/2025 ते दि. 18/09/2025 पर्यंत एकुण 40 दिवसांचे निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या उमेदवारांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, सायबर जनजागृती, महिला गुन्हे माहिती व नविन कायद्यांचे महत्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या 12 व्या सत्रामध्ये 125 युवकांनी आपला सहभाग नोंदविला होता. या प्रशिक्षणादरम्यान सर्व उमेदवारांना गडचिरोली पोलीस दलाचे वतीने लोअर, टी-शर्ट, शुज, लेखी परीक्षेकरीता आवश्यक अभ्यासक्रमाची पुस्तके व इतर आवश्यक साहित्य मोफत वितरीत करण्यात आले होते. आज आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभ प्रसंगी पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण घेतलेले 125 प्रशिक्षणार्थी हजर होते. या प्रशिक्षणा अखेर घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाया युवकांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यादरम्यान प्रशिक्षणाथ्यांनी पोलीस भरतीमध्ये यशस्वी होण्याचे मनोगत व्यक्त करून राबविल्या जाणाया या उपक्रमाबद्दल गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या एकूण 11 पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षणामध्ये गडचिरोली जिल्ह्रातील अतिदुर्गम भागातील एकुण 2318 युवक-युवतींनी आपला सहभाग नोंदविला आहे. यापैकी एकूण 205 युवक-युवतींची शासनाच्या विविध विभागांमध्ये निवड झालेली आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या एक गाव एक वाचनालय या उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील एकूण 72 ठिकाणी सुसज्ज वाचनालयांची निर्मिती करण्यात आली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून सन 2021 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत एकूण 11,01,014 नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी प्रशिक्षणाथ्र्यांना आगामी पोलीस भरती ही सुवर्ण संधी समजून पुढील 100 दिवस जिद्दीने, मेहनतीने आणि चिकाटीने परिश्रम करुन यश संपादन करण्याचा संदेश दिला. तसेच मैदानावरील मेहनतीसोबतच अभ्यास व जागतिक घडामोडी संदर्भात अद्यवत राहून अभ्यास करण्याबाबत मार्गदर्शन केले. यासोबतच पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांनी सर्व प्रशिक्षणाथ्र्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.
सदर पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके, सर्व पोलीस अंमलदार, अंतवर्ग व बाह्रवर्ग प्रशिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.