राजुरा येथील तरुणांचा मनसे पक्षाला रामराम ठोकत जय भवानी कामगार संघटनेत प्रवेश.
रोहित बात्ताशंकर यांची जय भवानी कामगार संघटनेत युवा शहर अध्यक्ष राजुरा या पदी नियुक्ती
राजुरा- सविस्तर वृत्त असे की, राजुरा शहरातील तरुणांनी २३ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या कार्याला प्रेरित होऊन चंद्रपूर जिल्ह्यातील मनसे पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पक्षप्रवेश तथा नियुक्ती करण्यात आली. यावेळेस श्री. आदित्य भाके यांची तालुका अध्यक्ष राजुरा मनसे व श्री. रोहीत बत्ताशंकर यांची राजुरा तालुका उपाध्यक्ष या पदी नियुक्ती करण्यात आली, तसेच श्री. साहिल चौधरी यांची शहर उपाध्यक्ष या पदी नियुक्ती करण्यात आली होती, पक्ष प्रवेशानंतर श्री. रोहीत बत्ताशंकर, राजुरा तालुका उपाध्यक्ष मनसे यांनी सातत्याने सक्रियपणे पक्ष वाढीकरिता प्रामाणिकपणे स्थानिक नेत्यांच्या सांगण्यावरून जनसेवेच्या कामात पुढाकार घेतला. यादरम्यान नागरिकांच्या प्राप्त तक्रारी चे निवारण करण्याकरिता संबंधित विभागांमध्ये व रुग्णालयामध्ये मदतीकरिता सज्ज असणाऱ्या श्री. रोहीत बत्ताशंकर यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतापून शाब्दिक बाचाबाची होऊन जनतेला न्याय देण्याकरिता चुकून कायदा हातात घेतल्यास तरुणांवर फौजदारी कार्यवाही झाल्यानंतर माननीय उच्च न्यायालया पर्यंत मदतीकरिता जावे लागले. परंतु या मदतीच्या काळामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मनसे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कुठलीही मदत न मिळाल्याने या मदतीच्या काळात जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे हे मदतीकरिता पुढे आले, ही मदत फक्त पहिल्यांदाच नसून या आधीच सुद्धा सुरजभाऊ ठाकरे यांनी केली असल्याने तथा इलेक्शन असो वा नसो तरी देखील सक्रियपणे जनतेच्या हिताकरिता/ न्याय मिळवून देण्याकरिता सातत्याने लढा देणाऱ्या त्यांच्या या लढवय्या वृत्तीला प्रेरित होऊन आज दिनांक- 30/10/2025 रोजी राजुरा येथील तरुणांनी मनसे पक्षाला राम राम ठोकत जय भवानी कामगार संघटना येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये संस्थापक अध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला. व या नव्या पर्वाची सुरुवात करण्याकरिता श्री. रोहित बत्ताशंकर यांची जय भवानी कामगार संघटनेत युवा शहराध्यक्ष राजुरा या पदी नियुक्ती करण्यात आली. व त्यांच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेत प्रवेश करणारे तरुण श्री. रोहीत बत्ताशंकर, राज लड्डा, साहिल चौधरी, बालाजी चौधरी, यश डोंगरे, गणेश लांडे, विजय तलांडे, सागर मिसलवार, चेतन मेश्राम, आशिष वडसकर, साहिल कायडिंगे आदींनी प्रवेश केला.


